सुकमा येथे चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा


वृत्तसंस्था / रायपूर :  छत्तीसगड राज्यातील  सुकमा येथे झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आज गुरुवारी जवानांना यश आले आहे. वंजम बुधू असे नाव असलेल्या या नक्षलवाद्यावर एक लाख रूपयांचे बक्षीस होते. शिवाय तो निलामाडगु क्रांतिकारी लोक समितीचा प्रभारी व जन मिलिशियाचा कमांडर होता. 
 सुकमाचे पोलिस अधिक्षक शालभ सिन्हा यांनी घटनेबाबत माहिती दिली आहे. मुरलीगुडा आणि अटकल भागातील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही डीआरजीचे पथक या भागात शोध घेण्यासाठी पाठवले होते. दरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, यास जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकी दरम्यान जवानांना या नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला. शिवाय घटनास्थळावरून नक्षलवाद्यांची शस्त्र, औषधांसह शस्त्रक्रियेच्या सामानाच्या पिशव्या देखील हस्तगत करण्यात आल्या.   Print


News - World | Posted : 2019-06-27


Related Photos