महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही : वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : एफडीसीएम सिंदेवाही वन परिक्षेत्रातील जाटलापूर (मोठा) कंपार्टमेंट क्रमांक-१६८ (गडमोशी बिट) येथे वाघाच्या हल्ल्यात ५० वर्षीय गुराखी जखमी झाला. 

माहितीनुसार, सिंदेवाही येथील दिलीप भिवाजी रेपकवार (५०) गुरे चरण्यासाठी जंगलाजवळ गेला. दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला करत त्याला जखमी केले. दरम्यान, वामन बोरकर जाटलापूर व सचिन बोरकर जाटलापूर हे दुचाकीवरून जाटलापूर (मोठा) या गावी जात असताना वाघापासून काही अंतरावर दिलीप रेपकवार गंभीर जखमी झाल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड करत जखमी दिलीप रेपकवार यांना वाघाच्या तावडीतून बाजुला केले व त्यांनी दुचाकीवरून तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचारासाठी आणले.

सिंदेवाही येथील ग्रामीण रूग्णालयात डॉ. बी.एम. कुलसंगे यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता शासकीय रूग्णालय चंद्रपूर येथे हलविले. व्ही.पी. धुर्वे, एफडीसीएम वनविभाग सिंदेवाही यावेळी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos