स्त्रचित्रकला व भरतकाम प्रशिक्षणासाठी ५ ऑक्टोबरला मुलाखती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भारत सरकार, महाराष्ट्र शासन व बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), भंडारा यांच्या वतीने स्वयंरोजगारासाठी इच्छुक युवक-युवतींसाठी वस्त्रचित्रकला व भरतकाम लघुउद्योजक (Embroidery) या विषयावरील ३१ दिवसीय मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाला ५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये हाताने भरतकामाची ओळख व प्रकार, भरतकामाची साधने, सुया, कापड व धागे, रंगसंगती व डिझाइन निवड, विविध मूलभूत टाके, सजावटीचे व पारंपरिक भरतकाम, मिरर व बीड वर्क, झरदोजी, अप्लिक वर्क तसेच चित्रकला व डिझाइनची मूलतत्त्वे, रंगसिद्धांत, टेक्स्चर, टाय-अँड-डाय, स्टेन्सिल व बटिक प्रिंटिंग आदींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासोबतच बँकिंग सेवा, कर्ज व विविध योजना, मार्केटिंग व्यवस्थापन, खर्च व किंमत ठरविणे, लेखा व नोंदवही याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणार्थींना जेवण, चहा-नाश्ता, प्रशिक्षण साहित्य, पुस्तके तसेच निवासाची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
स्वयंरोजगाराची आवड व व्यवसाय करण्याची तयारी असलेल्या १८ ते ५० वर्षे वयोगटातील, दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण इच्छुकांनी मुलाखतीसाठी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता बी.ओ.आय. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), लालबहादूर शास्त्री (म्युनिसिपल) शाळेजवळ, शास्त्री चौक, भंडारा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे संचालक मंगल निमजे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९५११८७५९०८, ८६६९०२८४३३, ९७६६५२२९८४, ८४२१४७४८३९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.




Petrol Price




