महत्वाच्या बातम्या

 मातृशक्तिच्या सन्मानार्थ गावांमध्ये निर्माण होतेय सर्वसुविधायुक्त महिला बचतगट भवन : आमदार विनोद अग्रवाल


- अभिसरण अंतर्गत २५ लक्ष रुपये च्या आमदार निधीतून ४५ महिला बचतगट सभागृह मंजूर, उर्वरित ४१ गावांमध्ये लवकरच करणार मंजूर.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यातील एकमेव मतदारसंघ आहे. जिथे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी गोदाम आणि गावातील महिलांसाठी बचत गट सभागृह उभारण्यासाठी क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी पुढाकार घेतला आहे. आपल्या मतदारसंघातील सर्वच ८६ ग्रामपंचायतींमध्ये ८६ कृषी गोदामे आणि ८६ सुसज्ज महिला बचत गट भवन असावीत. हे आमदार विनोद अग्रवाल यांचे स्वप्न असून, त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आमदार विनोद अग्रवाल यांच्या या संकल्पनेचे संपूर्ण राज्यात कौतुक होत आहे. प्रत्येक महिला बचत गट भवनासाठी अभिसरण अंतर्गत २५ लक्ष रुपये मंजूर असून यातून गावातील बचत गटातील महिलांसाठी एक सुसज्ज सभागृह बांधण्यात येत आहे.

आतापर्यंत ४५ ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी इमारतींना मंजुरी मिळाली असून अनेक ठिकाणी निर्माण कार्य सुरु देखील झाले आहे. उर्वरित ४१ ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी इमारती लवकरच मंजूर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गोंदिया विधानसभा मतदारसंघ हे राज्यातील एकमेव क्षेत्र आहे, जिथे गेल्या चार वर्षात १८ हजार आवास मंजूर झाले असून २५ हजार आवास मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत. संपूर्ण परिसर समृद्ध करण्याचा माझा प्रयत्न असून प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला पाहिजे आणि महिलांनीही विकासाच्या मुख्य प्रवाहात आल्या पाहिजे सोबतच महिलांना गृहउद्योग आणि लघुउद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे मत आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.

या गावांमध्ये महिला भवन  मंजूर -

बरबसपुरा, टेमणी, बटाना, आंभोरा, काटी, टेढ़वा, दासगाव बु., बनाथर, बिरसोला, कोरनी, कामठा, खातिया, पांजरा, चारगांव, छिपिया, आसोली, नवरगावकला, दतोरा, मुर्री, ढाकनी, पांढराबोडी, निलज, सिवनी, बघोली, तुमखेड़ा ख़ु., तांडा, चुलोद, खमारी, फुलचुर, कारंजा, चुटिया, लोहारा, किन्ही, नवेगांव धा., सोनपुरी, देवरी, लहीटोला, रजेगांव, वड़ेगाव आणि पिंडकेपार





  Print






News - Gondia




Related Photos