महत्वाच्या बातम्या

 मूल येथे लाच घेताना महिला दुय्यम निबंधकास अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : दस्त नोंदणीचे काम करून देण्याकरिता पंधरा हजार रुपयाची मागणाऱ्या दुय्यम निबंधकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. मूल येथे काल गुरूवारी सांयकाळी ही कारवाई करण्यात आली. वैशाली मिटकरी असे महिला दुय्यम निबंधकाचे नाव आहे.

माहितीनुसार, तक्रारदार मूल येथे दस्तलेखनाचे काम करतात. तक्रारदार यांच्या पक्षकाराची शेत जमीन फेरफार करायची होती. तक्रारदार यांनी दस्त तपासणी व शेत जमिनीचे मूल्यांकन काढून दस्ताची मुद्रांक व नोंदणी फी बाबत विचारणा केली असता, दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी यांनी दस्त नोंदणीचे काम करून देण्याकरिता गैर अर्जदार यांना शासकीय शुल्का व्यतिरिक्त पंधरा हजार रुपयाची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना गैरअर्जदाराने लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांना भेटून तक्रार दाखल केली. या सदर तक्रारीची पडताळणी करून काल गुरूवारी सायंकाळी लाचलुचपत विभगाने सापळा रचला.
यामध्ये महिला दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी यांनी शेतीचे दस्त नोंदणी करण्याचे कामाकरिता तळजोडीअंती दहा हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

सदरची कार्यवाही राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, ला. प्र.वि. नागपूर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर तसेच मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र. वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोहवा. हिवराज नेवारे, पो.अ. वैभव गाडगे, अमोल सिडाम, म. पो.अ. पुष्पा काचोळे  व चा.पो.अ. शामराव बिडगर मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos