महत्वाच्या बातम्या

 वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात कलम १४४ लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघाअंतर्गत एफएलसी ओके ईव्हीएम म्यॅन्युअल ऑन ईलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन व्हीव्हीपॅट चॅप्टर १ सेक्शन १.१ अन्वये सेवाग्राम रोडवरील महाराष्ट्र  राज्य वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक ६ मधील स्ट्रॉंगरुम मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. याकरीता सदर परीसरामध्ये अनुसचित प्रकार घडू नये. याकरीता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी गोदाम क्रमांक ६ परिसरात ३० नोव्हेंबर पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू केली आहे.

६ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत गोदाम क्रमांक ६ च्या १०० मिटरच्या परिसरात २ अथवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना फिरण्यास अथवा जमा होण्यास निर्बंध घालण्यात आले असून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये जमाबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी असे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेशान्वये कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos