बालभारतीच्या क्रमिक पाठ्यपस्तकाचे फ्लीप बुक ऑनलाईन प्रकाशित


- महाराष्ट्र  तंत्रंस्नेही शिक्षक समूहाचा उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नंदोरी : 
तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र राज्य आयोजित बालभारती क्रमिक पाठयपुस्तक फ्लिपबुक ऑनलाईन प्रकाशन सोहळा २२ जून  रोजी पार पडला.  प्रादेशिक विद्याप्राधिकरण नाशिक च्या उपसंचालक   पुष्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि  सिद्धाराम माशाळ , हेमा शिंदे-वाघ ,  मुख्य प्रशासक भालचंद्र भोळे, बाळासाहेब वाघ, अलंकार वारघडे  आणि चाचणी निर्मितीप्रमुख  समीर सैय्यद  विद्या प्राधिकरण पुणे , सदाशिव अत्तारकर  शैक्षणिक बातमी प्रसारक,  मिलिंद पगारे  ज्येष्ठ  मार्गदर्शक यांच्या प्रमुख उपस्थितीत बालभारती क्रमिक पाठयपुस्तक फ्लिपबुक ऑनलाईन प्रकाशन सोहळा पार पडला. बालभारती क्रमिक पाठयपुस्तक फ्लिपबुक बनविण्यासाठी  समूह प्रमुख  नितीन केवटे , भालचंद्र भोळे,  ओंकार भोई , समाधान अहिरे,  नितीन गुंजाळ,  विश्वभर बोकडे,   गीतांजली गजबे ,  क्रांती महिरे यांच्या मार्गदर्शनाखाली , ओंकार भोई,  संजय राठोड,  वैशाली शिंदे,  कृष्णा कालकुंद्रीकर,  महेश पराड,  सुदर्शना नाईकनवरे, खुशाल डोंगरवार यांनी सहकार्य केले.   Print


News - Wardha | Posted : 2019-06-24


Related Photos