सात वर्षीय मतिमंद मुलीवर चुलत भावानेच केला अत्याचार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / पवनी :
तालुक्यातील शेळी या गावातील नराधमाने अपंग व मतिमंद असलेल्या स्वतःच्या चुलत बहिणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
 अटक केलेल्या आरोपीचे नाव सेवक बापूराव कुंभले (२६) असे  असून पीडित मुलीचा तो चुलत भाऊ लागतो.  मात्र दारू च्या नशेत मुलीच्या घरात घुसून मुलीच्या चौदा वर्षीय भावाला मारहाण करून घरातून बाहेर काढून त्या मतिमंद मुलीवर अत्याचार केला.
  तिकडे पीडित मुलीचा भाऊ रडत रडत आई काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन आपबिती सांगताच आईने घराकडे धाव घेतली.  तो पर्यंत नराधम सेवक याने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करुन मोकळा झाला होता. 
पीडित मुलगी ही अपंग व मतिमंद असल्यामुळे आई, वडील तिला घरी एकटे ठेवत नव्हते.  मात्र घटनेच्या दिवशी पीडित मुलीचे आजी - आजोबा बाहेरगावी नातेवाईकाच्या अंत्यसंसाराला गेल्यामुळे व पीडितेचे  आई, वडील कामावर गेल्यामुळे चौदा वर्षीय मुलाला मतिमंद बहिणीकडे लक्ष देण्याची जबाबदारी दिली. मात्र वयाने मोठा असलेला व  दारूच्या नशेत असलेल्या चुलत भावाने पीडित्याच्या  भावाला मारहाण करून घराबाहेर हाकलून लावून त्या अपंग मतिमंद असहाय्य मुलीवर अत्याचार केला. 
    घटनेची तक्रार पीडित मुलींच्या आईने पवनी पोलिसात दिली असून आरोपो विरुद्ध ३७६ अ , ब , सहकलम ४/६ पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला असून आरोपी सेवक यास अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनुराधा फुकट तपास करीत आहेत.  Print


News - Bhandara | Posted : 2019-06-21


Related Photos