महत्वाच्या बातम्या

 शेतक-यांना व नागरिकाला कोणताही त्रास होणार नाही याची महावितरण खबरदारी घ्यावी : खासदार रामदास तडस


- वर्धा जिल्हयातील महावितरण विभागाच्या वीज संदर्भात असलेल्या शेतक-यांना व नागरिकांना  उद्भवणा-या समस्या  संदर्भात आढावा बैठक संपन्न.

- शेतक-यांना कृषी पंप विद्युत कनेक्शन, शेतक-यांना व्होल्टेज प्रश्न, वाढीव वीज बिल प्रश्न, अतिरिक्त क्षमतेच्या रोहित्रे, सोलर उर्जा, केन्द्रसरकारची सुधारित वितरण क्षेत्र (RDSS) योजनेची अमलबजावनी, कृषी पंप योजना, नागरिकांना पुर्व सुचना न देता विद्युत पुरवठा खंडीत करणे, महावितरण विविध विषयावर सविस्तर चर्चा.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शेतीवरील वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने होणे जास्त प्रमाणात लोड आल्यामुळे तारा तुटून पडतात, यामुळे शेतीला पाणीपुरवठा करणारे कृषीपंप आणि ट्रान्सफॉर्मर देखील नादुरुस्त होत आहे. यातून मोठे अपघात होण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी व्होल्टेज प्रश्न उद्भवत आहे, विज पुरवठा सुरळीत चालु राहण्याकरिता जिथे कमी दाबाने वीजपुरवठा होतो, तिथे उच्च दाबाने वीजपुरवठा व्हावा यासाठी अतिरिक्त क्षमतेच्या रोहित्रे बसविण्यात यावे. शेतक-यांच्या मागणी प्रमाणे त्वरीत कृषी विद्युत पुरवठा त्वरीत देण्याकरिता नियोजन करावे, शेतक-यांना व नागरिकाला कोणताही त्रास होणार, नाही या दृष्टिकोनातून लवकरात- लवकर समस्या सोडवून महावितरण कंपनीमार्फत योग्य सेवा पुरवण्यात यावी.

लाईट बिलाचे प्रश्न हे त्या- त्या विभागात सोडविण्यात यावेत, त्यासाठी जनतेला विभाग कार्यालयात यायला लावू नये याची खबरदारी घ्यावी. केन्द्र सरकारच्या योजनेची अमलबजावनी करावी, तसेच जिल्हयात विजेची वाढती मागणी लक्षात घेऊ तसेच नागरिकांना सौर उर्जा कनेक्शन देण्याकरिता जनजागृती करावी अश्या सुचना यावेळी खासदार रामदास तडस यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला दिल्या.

वर्धा जिल्हयातील महावितरण विभागाच्या वीज संदर्भात असलेल्या शेतक-यांना उद्भवणा-या समस्या व इतर विषयासंबधीत आढावा बैठक खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी प्रदीप घोरुडे प्रभारी अधीक्षक अभियंता वर्धा मंडळ, स्वप्निल गोतमारे कार्यकारी अभियंता वर्धा विभाग, हेमंत पावडे कार्यकारी अभियंता हिंगणघाट विभाग, प्रशांत गायकवाड कार्यकारी अभियंता आर्वी विभाग उपस्थित होते.

या बैठकीत शेतक-यांना कृषी पंप विद्युत कनेक्शन, शेतक-यांना व्होल्टेज प्रश्न, वाढीव वीज बिल प्रश्न, अतिरिक्त क्षमतेच्या रोहित्रे, सोलर उर्जा, केन्द्रसरकारची सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS) योजनेची अमलबजावनी, कृषी पंप योजना, नागरिकांना पुर्व सुचना न देता विद्युत पुरवठा खंडीत करणे, महावितरण विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हयातील २०२१ पर्यंत ३०३२ कनेक्शन पुर्ण झालेले असुन १९२५ पेडींग आहे, मागणी प्रमाणे जोडणी सुरु आहे.  वर्धा जिल्ह्यात मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन मंजुर कामापैकी ९० टक्के कामे पुर्ण झालेले आहे, या वर्षी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ११.५० कोटी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. 

वर्धा जिल्हयात वेगवेगळया ठिकाणी ३४६ एकर जागा उपलब्ध करुन सौर उर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. वर्धा जिल्हयासाठी केन्द्रसरकार सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS) योजने अंतर्गत नविन सबस्टेशन करिता रु. ३१४ कोटी मंजुर झालेले आहे. जिल्हयातील शेतक-यांना कृषी पंप योजनेतुन अतिरिक्त क्षमतेच्या रोहित्र बसविणे सुरु असल्याची माहिती यावेळी उपस्थित अधिकारी वर्गांनी दिली व सनासुदीच्या काळात शेतक-यांना व नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याबाबत आश्वस्त केले.





  Print






News - Wardha




Related Photos