पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रांची येथे ४० हजार लोकांसोबत योगा


वृत्तसंस्था / रांची : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रांची येथे ४० हजार लोकांसोबत योगा केला . रांचीच्या प्रभात तारा मैदानावर या योग शिबिराचं आयोजन करण्यात आले.  
आज भारतासह संपूर्ण जगात ५ वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येत आहे. योग दिनानिमित्त क्लायमेट ॲक्शन ही थीम आहे. दिल्लीत ३०० ठिकाणी योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. तर रांची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत योग दिनाचा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे रांचीच्या प्रभात तारा मैदानावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.   केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  हरियाणाच्या रोहतक येथे होणाऱ्या मेला मैदानावरील योग कार्यक्रमात भाग घेतला.  अरुणाचल प्रदेशात इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीसांनी नदीत उभं राहून योगासनं केली. तर नांदेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग गुरू रामदेव बाबा यांच्यासोबत योगासनं केली.   Print


News - World | Posted : 2019-06-21


Related Photos