गडचिरोली जिल्ह्यातील ९ प्रा. आ. केंद्रांना मिळाल्या रूग्णवाहिका


- जिल्हाधिकारी कार्यालयात झाले लोकार्पण
- उर्वरीत रूग्णवाहिका लवकरच दाखल होणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात आरोग्य सेवेत आवश्यक सुविधांची मोठ्या प्रमाणात वाणवा आहे. महत्वाचे म्हणजे रूग्णवाहिकांची कमतरता असल्यामुळे वेळेवर रूग्ण रूग्णालयापर्यंत पोहचण्यात उशिर होतो. प्रसंगी रूग्ण दगावण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेवून जिल्हाधिकारी यांनी केंद्रीय सहाय्यता निधीमधून २० रूग्णवाहिका निर्लेखीत करण्यात केल्या. यापैकी ९  रूग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच करण्यात आले.
रूग्णवाहिकांच्या चाव्या रूग्णवाहिका चालकांकडे सोपवून त्यांना रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिताताई भांडेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शशिकांत शंभरकर, जि.प. चे कृषी सभापती नाना नाकाडे, जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम मेश्राम यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील 20 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रूग्णवाहिका निर्लेखीत करण्यात आल्या. यापैकी भामरागड तालुक्यातील आरेवाडा, मन्नेराजाराम, लाहेरी, एटापल्ली तालुक्यातील कसनसूर, गट्टा, धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, सिरोंचा तालुक्यातील टेकडाताला, अंकीसा, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, कमलापूर या प्राथमिक आरोग्य केंद्रांना रूग्णवाहिका मंजूर झाल्या. यापैकी ९ रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले असून अंकीसा प्रा. आ. केंद्राला लवकरच रूग्णवाहिका प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-20


Related Photos