सोनसरी येथील धान खरेदी केंद्रावर विद्युत तारेच्या स्पर्शाने मजुराचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
तालुक्यातील  सोनसरी येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या रब्बी धान खरेदी केंद्रावर गोडावून मध्ये पोती मांडत असताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन मजुराचा मृत्यू झाल्याची  दुर्दैवी घटना आज १७ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. 
 बंडू काशिनाथ टेकाम (३५)  रा.सोनेरांगी  असे मृतक मजुरांचे  नाव आहे.  प्राप्त माहितीनुसार  मृतक मजूर सोनसरी येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या रब्बी धान खरेदी केंद्रावर हमालीचे काम करीत होता.  दरम्यान आज दुपारी  दीड वाजताच्या सुमारास सोनसरी येथील जुनी आश्रम शाळेत अस्थायी गोडाऊन मध्ये धानाची पोती मांडताना सदर मजुरांच्या हातातील लोखंडी हुकाचा स्पर्श विद्युत तारेला झाला .  त्याला लगेच कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे.  त्याच्या मृत्यूने सोनेरांगी येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-17


Related Photos