पश्चिम बंगालमधील हिंसाचाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारला ‘दंडशक्ती’चा वापर करावा लागेल, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी  केले.  
रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी भागवत बोलत होते. पश्चिम बंगालमधील  हिंसाचाराचा उल्लेख भाषणात करताना भागवत म्हणाले, निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोप होतच असतात. आता निवडणुका संपल्या, पण त्याचे कवित्व संपले नाही. आज पश्चिम बंगालमध्ये काय सुरू आहे. समाजा-समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेचा दुरुपयोग ही तर लोकशाहीची थट्टा आहे.काही शक्ती तेथे अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.  एक पराभव सहन होणे ही चांगली बाब नाही. एकीकडे देश तोडणाऱ्यांविरुद्ध लढत असल्याचा देखावा करायचा आणि दुसरीकडे समाज समाजाला लढवून आपली राजकीय पोळी शेकायची हे चांगले नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारला दंडशक्तीचाच वापर करावा लागेल.असे ते म्हणाले.   Print


News - Nagpur | Posted : 2019-06-17


Related Photos