महत्वाच्या बातम्या

 मतदान केंद्र सुसूत्रीकरण बाबत अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी घेतला आढावा


- राजकीय पक्ष व मतदार नोंदणी अधिका-यांची उपस्थिती 

विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघांतर्गत बदल होणा-या मतदान केंद्रांची माहिती राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली मतदान केंद्र सुसुत्रिकरणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला नरेंद्र फुलझेले यांच्यासह  उप जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत, ४७ - वर्धा मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, ४६ -हिंगणघाट मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, ४४ -आर्वी  मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी  तथा उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, ४५ - देवळी मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, नायब तहसिलदार अतुल रासपायले, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संयोजक प्रविण चोरे, बहुजन समाज पार्टीचे दिपक भगत, ओमप्रकाश भालेराव, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे समन्वयक अविनाश भांडे, जिल्हा प्रमुख श्रीकांत मिरापुरकर, आम आदमी पार्टीचे जिल्हा प्रमुख प्रमोद भोमले, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे जिल्हा जनसंपर्क प्रमुख नंदकुमार काबंळे, कम्यिुनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्टचे जिल्हाध्यक्ष भैय्या देशकर आदी उपस्थित होते.

यावेळी अनिल गावित यांनी वर्धा लोकसभा मतदार संघांतर्गत बदल होणा-या मतदान केंद्राची माहिती सर्व प्रतिनिधींसमोर मांडली. तसेच विविध मतदान केंद्राच्या खोली तसेच जागेबाबत होणा-या बदलासंबंधी  संपुर्ण माहिती सादर केली. आवश्यक असलेल्या बदलांच्या अनुषंगाने सदर माहिती निवडणूक आयोगास सादर केल्यानंतर त्याची प्रत संबंधित राजकीय पक्षांना पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले. नवीन मतदान केंद्र, स्थलांतरीत मतदान केंद्र, नावात बदल झालेले प्रस्तावित मतदान केंद्राची माहिती सभेत देण्यात आली. बदल होणा-या मतदान केंद्राबाबत असलेल्या अडचणी व समस्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींकडून जाणून घेण्यात आल्या.





  Print






News - Wardha




Related Photos