महत्वाच्या बातम्या

 सेवा पंधरवडा निमित्य  मुरखळा (माल) येथे स्वच्छता अभियान 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता हि सेवा १ तास माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम ग्रामपंचायत मुरखळा (माल) तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) यांच्या संयुक्त विद्यमाने काल १ ऑक्टोबर २०२३ रोज रविवारला आयोजित करण्यात आले. 

यावेळी मुरखळा (माल) ग्रामपंचायत चे सरपंच भास्कर बुरे, ग्रामविस्तार अधिकारी यादव मुळे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना कालिदास नैताम, कल्पना विजय कन्नाके, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) चे मुख्याध्यापक गणेश बोईनवार, पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर, सहायक शिक्षक अशोक जुवारे, अंगणवाडी शिक्षिका राऊत, बुरे, गेडाम, संगणक परिचालक सुषमा गेडाम, उमेदच्या कार्यकर्त्या कुसुम सुनिल धोडरे, इंदु मोरेश्वर पवार, प्रतिष्ठित नागरिक यादव बुरे, शामराव निशाणे, माणिक घोगरे, सचिन तुंबडे, राकेश नैताम तसेच शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरिक यांचे प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos