महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही : बुद्धिविधाता गणेश मंडळातर्फे मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही-लोनवाही प्रभाग क्रमांक-३ येथे गणेश उत्सवानिमित्त बुद्धिविधाता गणेश मंडळ लोणवाही तसेच समता फाउंडेशन मुंबई जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ३९० सहभागी रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यात मोतीबिंदूचे ७२ रुग्ण आढळले. या मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना वर्ध्याच्या सावंगी (मेघे) ग्रामीण रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया व उपचारासाठी पाठविण्यात आले. या रुग्णांची संपूर्ण जबाबदारी बुद्धिविधाता गणेश मंडळाने घेतली आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहीचे नेत्रतज्ज्ञ डॉ.सुभाषचंद्र दुधे तसेच त्यांच्या सहाय्यक हीना परचाके व गणेश मंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos