महत्वाच्या बातम्या

 प्रलंबित प्रकरणांना गती दयावी : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


- जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : अनुसूचीत जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत प्रलंबित प्रकरणाना गती  देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयल येथील सभागृहात आयोजीत बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा शल्य चिकीत्सक दिपचंद सोयाम, पोलीस विभागाचे अधिकारी व आदी अधिकारी उपस्थित होते.

गेल्या बैठकीतील इतीवृत्ताची माहिती सहायक आयुक्त देशमुख यांनी यावेळी दिली. सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन वर्षाचे १० प्रकरणे प्रलंबित असुन त्यापैकी ३ प्रकरणात दोषारोप अहवाल न्यायालयात सादर करण्यात आले असून एका प्रकरणात केस क्रमांक प्राप्त होणे बाकी असून उर्वरीत सहा प्रकरणे पोलीस तपासावर असल्याने प्रलंबित असल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले. तालुक्यावर दक्षता व नियंत्रण समितीच्या नियमीत बैठका होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.





  Print






News - Bhandara




Related Photos