२८ व २९ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणूकीचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात २८ व २९ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद उत्सव साजरा करण्यात येत असून ईद-ए-मिलाद उत्सवानिमित्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मिरवणूक २८ सप्टेंबर २०२३ रोजी पडोली, राजुरा, कोठारी, वरोरा, भद्रावती, माजरी, चिमूर, शेगाव, भिसी, ब्रह्मपुरी, नागभीड, तळोधी, सिंदेवाही, मुल, गोंडपिपरी, पोभुर्णा, गडचांदुर, कोरपना व जिवती या शहर व तालुक्याच्या ठिकाणी तर २९ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहर, रामनगर व बल्लारपूर शहरात मिरवणूक निघणार आहे.
याबाबत नागरीकांनी नोंद घ्यावी व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.
News - Chandrapur