एमआयएम चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे लहान बंधू आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांची प्रकृती चिंताजनक


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली :  एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे लहान बंधू आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर लंडन येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अकबरुद्दीन ओवैसी यांची यांची तब्येत खालावत चालली असून त्यांचे बंधू असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.  
अकबरुद्दीन ओवैसी हे तेलंगणा विधानसभेतील आमदार आहेत. एमआयएम पक्षाकडून हैदराबाद येथून ते निवडून आले आहेत. २०११ मध्ये एका सभेदरम्यान अकबरुद्दीन यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. मजलिस तेहरिक पार्टीशी संबंधित मोहम्मद पेहलवान नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केला होता. आर्थिक व्यवहाराच्या वादावरून अकबरुद्दीन यांच्यावर गोळीबार झाला होता. यात अकबरुद्दीन यांच्या आतड्यांना गंभीर दुखापत झाली होती. गोळीचे काही अंश त्यांच्या मणक्यापर्यंतही पोहचले. त्यामुळे त्रास अधिक होत होता.
सुरुवातीला त्यांच्यावर तेलंगणातील चांद्रगुगुट्टू येथे उपचार सुरू होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. शनिवारी जास्त त्रास सुरू झाल्याने त्यांना तात्काळ लंडनला हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी ईद मिलापच्या दिवशी असदुद्दीन यांनी त्यांच्या भावासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.  Print


News - World | Posted : 2019-06-11


Related Photos