सर्वसामान्यांना सोबत घेवून चालण्याच्या वृत्तीने पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम ठरले लोकप्रिय


- विकासकामे खेचून आणण्यातही ठरले यशस्वी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राजघराण्याचा वारसा पुढे चालवित समाजकारणासोबत राजकारण करीत राजे असल्याचा कोणताही बडेजाव न करता सर्वसामान्य नागरीक, कार्यकर्त्यांना सोबत घेवून चालण्याच्या वृत्तीमुळे राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम हे लोकप्रिय ठरले आहेत. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात विकासकामांचाही झंझावात दिसून येत आहे. अनेक कामे केली मात्र कधी गवगवा केला नाही, हे सुध्दा विशेष.
ना. आत्राम हे कार्यकर्त्यांना अग्रस्थानी माणून चालणारे व्यक्तीमत्व आहेत. कोणत्याही कार्यकर्त्यांनी घेवून गेलेली कामे मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा करून कामे पूर्णत्वास नेण्यात ते कोणतीही कसर सोडत नाहीत. अगदी लहान मुलांपासून तर थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे एकून घेतात. विविध सण, उत्सव, समारंभांमध्ये सहभागी होउन विविध धर्मांच्या, जातीच्या लोकांमध्ये जातात. दुर्गा उत्सव, गणेशोत्सव, मुस्लीम समाजाचे उत्सव, इफ्तार पार्टी अशा उपक्रमांमध्ये स्वतः पुढाकार घेतात. दुर्गा व गणेशोत्सवात स्वतः उपस्थित राहून दररोज पुजा - अर्चा करतात, प्रसाद वितरीत करतात. यामुळे जनतेचे राजे अशी ओळख निर्माण केली आहे.
सामान्य कार्यकर्त्यांच्या अडी - अडचणी जाणून घेणे, त्यांच्या घरी भेट देणे, स्वतः घरी जावून कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करणे यामुळे कार्यकर्त्यांना त्यांनी आपलेसे करून घेतले आहे. 
पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ना. आत्राम यांनी विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजेच त्यांच्या काळात सर्व तालुक्याच्या ठिकाणी ग्रामपंचायतींऐवजी नगर पंचायतींची निर्मिती झाली. केवळ नगर पंचायती निर्माण करणे एवढेच नाही तर प्रत्येक नगरपंचायतींना विकासकामांसाठी कोट्यवधींचा विकासनिधी मिळवून दिला. यामुळे तालुका मुख्यालयी मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. जिल्हा मुख्यालयी अनेक वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले महिला रूग्णालय, कृषी महाविद्यालय सुरू झाले. महामार्गांच्या कामांना मंजूरी मिळाली, महामार्गांची कामे सुरू झाली. अहेरी येथेही महिला व बाल रूग्णालयाला निधी खेचून आणला. अहेरी, सिरोंचा येथे अग्नीशमन वाहने, रूग्णवाहिका, शववाहिका उपलब्ध करून दिली. 
विद्यार्थ्यांच्या गुणांना चालना मिळावी यासाठी आश्रमशाळांमध्ये विविध सोयी - सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी फिरते मोबाईल युनिट, खेळाडूंना चालना देण्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा गडचिरोलीत आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच अनेक गावांमध्ये क्रिकेेट स्पर्धा, व्हाॅलिबाॅल स्पर्धांच्या उद्घाटन समारंभांना उपस्थित राहून खेळाडूंमध्ये उर्जा निर्माण केली.  
जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, रखडलेले सिंचन प्रकल्प, आलापल्ली तसेच इतर ठिकाणच्या बसस्थानकांचा प्रश्न निकाली काढला. अशा अनेक विकासकामांना प्राधान्य दिल्यामुळे व सर्वसामान्यांमध्ये रममाण झाल्यामुळे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम हे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या नेत्यांपेक्षा वेगळे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-10


Related Photos