२ कोटींची बीएमडब्ल्यू खरेदी केली, पेट्रोल भरण्यासाठी कोंबड्या आणि बदकांची चोरी


वृत्तसंस्था / बीजिंग :  चीनमधील एका श्रीमंत शेतकऱ्याने बीएमडब्ल्यू   कार खरेदी करून काही दिवस वाहवहकी आणि बडेजाव मिरवला .  पण नंतर कारमध्ये पेट्रोल भरणे त्याला झेपले नाही . यामुळे बीएमडब्ल्यू  कारने फिरण्याची हौस पूर्ण करण्यासाठी  या पठ्ठ्याने लोकांच्या घरातील कोंबड्या आणि बदक चोरीचा धडाका लावला. या कोंबड्या आणि बदक विकून तो त्याच्या बीएमडब्ल्यूमध्ये  पेट्रोल भारत होता.  शेवटी त्याची चोरी सापडली आणि पोलिसांनी त्याला  बेड्या ठोकल्या .
  एप्रिल महिन्यापासून सिचुआन प्रांतातील लिंशुई कंट्री  गावातील पक्ष्यांची चोरी करत होता. त्याला पोलिसांनी पकडल्यावर त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी सांगितले की, त्याने ही चोरी त्याच्या बीएनडब्ल्यूमध्ये पेट्रोल भरण्यासाठी केली होती.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही व्यक्ती रात्री उशीरा त्याच्या बाइकने कोंबड्यांची चोरी करायला जात होता. पकडला गेल्यावर कोंबड्या आणि बदक त्याचे असल्याचे सांगत होता. पण जेव्हा पोलिसांनी गावातील वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले, तेव्हा मात्र त्याची चोरी लपू शकली नाही.  २२ मे ला पोलिसांनी त्याच्या कारचा पाठलाग केला. पण तो पोलिसांना मागे टाकत पळून गेला. यावर पोलिसांनी सांगितले की, 'तो बीएमडब्ल्यूमध्ये होता आणि वेगाने जात होता. त्यामुळे आम्ही त्याला पकडू शकलो नाही'. पण नंतर त्याला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली.    Print


News - World | Posted : 2019-06-10


Related Photos