महत्वाच्या बातम्या

 गणेश नगर, प्रभाग १९ मध्ये १ कोटी रुपयांचे कामांचे भूमिपूजन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : जनतेचे आ. विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून गणेश नगर प्रभाग १९ मध्ये सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात गणेश नगरातील गणेश मंदिराची पुनर्बांधणी, शिव मंदिरातील सामाजिक सभागृह, अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याचे बांधकाम, हायमास्क लाइट, खुर्ची, नगर परिषद शाळेच्या मैदानाचे सुशोभीकरण, ग्रीन जिमचा समावेश आहे.

आ.विनोद अग्रवाल यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला असून प्रत्येक समाजातील देवस्थानाचे सुशोभीकरण, सार्वजानिक स्थळाचे सुशोभीकरण, रस्त्यांचे बांधकाम, ग्रीन जीम, हायमास्ट लाईट, सभागृहाचे बांधकाम अशा विविध कामांचा कार्यारंभ केला असून अनेक कार्य पूर्ण देखील झाले आहेत.

यावेळी कशिश जायसवाल शहर अध्यक्ष जनता की पार्टी, शिवजी शर्मा नगर परिषद पूर्व उपाध्यक्ष, सौ.नेहा रॉकी नायक पूर्व पार्षद, पंकज सोनवाने, मोन्या नागदवने, इसरका, डॉक्टर छीतरका व परिसरातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.





  Print






News - Gondia




Related Photos