वासाळा येथे १२५ रूग्ण नेत्र शस्त्रक्रियेसाठी पात्र, ७ रक्तदात्यांनी केले रक्तदान


- प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर  
 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : 
प्रहार जनशक्ती पक्ष, आरमोरी शाखा वासाळा तर्फे आज  ३  जून रोजी मोफत नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबीर तसेच रक्तदान शिबीर पार पडले.  या शिबीरात २००  रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२५ रूग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. तसेच ७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 
  शिबीराचे उद्घाटन   पजिल्हा रूग्णालय आरमोरीच्या अधीक्षक डाॅ. उईके  यांच्याहस्ते करण्यात आले.  प्रमुख अतिथी  म्हणून प्रहार जनशक्ति पक्ष संपर्क प्रमुख. मंगेश  देशमुख,  रुग्णमित्र तसेच विदर्भ प्रमुख प्रहार जनशक्ति पक्ष गजु  कुबडे ,  गटविकास अधिकारी   मोहितकर  , पोलीस निरीक्षक  अजीत राठोड, आरोग्य अधिकारी ठिकरे  ,  नेत्र चिकित्सक  रविंद्र टिचकुले  , प्रहार अपंग क्रांती  जिल्हा अध्यक्ष  मंगेश पोरटे  आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच वासाळ्याचे ग्रामसेवक   दुधे  , प्राथ.आरोग्य केंद्र वडधा येथिल डाॅ. पि. एस. मडावी , वासाळ्याचे तलाठी  शेंडे , तंटामुक्त समितीचे  अध्यक्ष   रामदास जौंजाळकर, परिचारिका कोहाडे  , आरोग्यदूत  शशीकांत मडावी, प्रहार अपंग क्रांतीचे तालुकाध्यक्ष  अरविंद धकाते, अक्षय बोरकर,  अप्रव भैसारे,  शुभांगीताई  गराडे,  संकेत गड्डमवार,  रिंकू झरकर, निखील धार्मिक,  विकास धंदरे, विनोद निमजे,  गोलू ठाकरे इ. प्रहार जनशक्ति पक्षाचे पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचालन  उमेश कोडाप यांनी केले.   आभार  राहुल पांडव व तारकेश धंदरे यांनी मानले. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-03


Related Photos