खाजगी बसची मोटारसायकला धडक, तीन युवक जागीच ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा : 
वर्धा वरून सालोड ला मोटारसायकलने जात असताना विरुद्द दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने दोन जण जागीच ठार तर एक जण सावंगी रुग्णालयात मृत्यू पावल्याची घटना सावंगी जवळील हनुमान मंदिर जवळ  काल १ सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. 
अजय कुभरे , अनिकेत घोडाम दोघेही रा, सालोड तर प्रितेश कौरती रा.दहेगाव गोंडी असे मृतक युवकांची नावे आहेत.   
 तिघेही जण रात्री दहा वाजता अजय कुमरे  याचे मोटार सायकल क्रमांक एम एच - ३२  ए जी - ८६९९ ने सालोड ला जात असताना यवतमाळ वरुन नागपुर कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच -२९ ए के ०९०९ ने सावंगी जवळ असलेल्या हनुमान मंदिर जवळ मोटार सायकलला जबर धड़क दिली.  यामधे मोटारसायकल वरिल दोघे जागीच ठार झाले तर एक सावंगी रुग्णालयात उपचार दरम्यान मरण पावला. 
या घटनेची सावंगी पोलीस स्टेशनला नोंद करून  ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध  दाखल केला असून चालक मंगेश रोहणकर रा.यवतमाळ याला सावंगी पोलिसानी अटक केली आहे. 

   Print


News - Wardha | Posted : 2018-09-02


Related Photos