महत्वाच्या बातम्या

 ग्रा. पं. निवडणूकीसाठी १६ ऑक्टोंबर रोजी मतदार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / देसाईगंज : राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने ७ सप्टेंबरच्या आदेशानुसार निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आता १६ ऑक्टोंबरला मतदान होणार आहे. यापुर्वी मतदान १३ ऑक्टोंबरला जाहीर करण्यात आले होते. मात्र आता यामध्ये बदल करून रविवार १६ ऑक्टोंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सोमवार १७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २० ऑक्टोंबर रोजी निवडणुकीचा निकालाची अधिसुचना प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे राय निवडणूक आयोगाच्यावतीने २६ सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos