महत्वाच्या बातम्या

 कागजनगर आणि बल्लारशाह दरम्यान पायाभूत सुविधांच्या कामामुळे रेल्वे गाड्या रद्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाने कागजनगर - बल्लारशाह मार्गावरील माकोडी - सिरपूर टाऊन - सिरपूर कागजनगर स्थानकांदरम्यान तिसरी लाईन सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामाच्या संदर्भात पायाभूत सुविधांचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे दक्षिण कडे काही गाड्या रद्द केले असून काही गाड्या चे मार्ग बदलविले आहेत.

पूर्व-नॉन-इंटरलॉकिंग कामकाजाची तारीख १० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर पर्यंत आहे तर नॉन-इंटरलॉकिंग कामकाजाच्या तारखा २२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत आहे. वरील कामामुळे, मध्य रेल्वेच्या मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे २२१५१ पुणे - काझीपेठ एक्सप्रेस प्रवास सुरू होण्याची तारीख २२ सप्टेंबर २०२३ रोजी रद्द, २२१५२ काझीपेठ-पुणे एक्स्प्रेस २४ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आले आहे.

तसेच २०८०३ विशाखापट्टणम - गांधीधाम एक्सप्रेस प्रवास सुरू होण्याची तारीख १४ सप्टेंबर २०२३, २१ सप्टेंबर २०२३, २०८०४ गांधीधाम - विशाखापट्टणम एक्स्प्रेस प्रवास सुरू होण्याची तारीख २४ सप्टेंबर २०२३,२०८१९ पुरी-ओखा एक्सप्रेस प्रवास २४ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होईल ते सर्व गाड्या नागपूर वरून वळविण्यात आले आहे .

अकोलामार्गे गाड्यांच्या मार्गात बदल करणारे १२६५५ अहमदाबाद-चेन्नई एक्सप्रेस प्रवास २१ सप्टेंबर २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत १२६५६ चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेस प्रवास २१ सप्टेंबर २०२३ ते २६ सप्टेंबर २०२३ पर्यंत तर बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारशाह येथे थांबणार नाही.

या गैरसोयीसाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अजय दुबे सदस्य, राष्ट्रीय रेल्वे ग्राहक सल्लागार परिषद, रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos