महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय कराटे स्पर्धेत खेळाडूंची दमदार कामगिरी : ९ सुवर्ण, ५ रौप्य आणि ४ कांस्यपदकांची कमाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : उज्जैन (मध्य प्रदेश) येथे २७ सप्टेंबर २०२६ रोजी शोतोकान कराटे-डो इंडियन असोसिएशनतर्फे राष्ट्रीयस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील शोतोकान कराटे-डो असोसिएशन, बल्लारपूर तालुका क्रीडा व शिक्षण बहुउद्देशीय संस्था, बल्लारपूर येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल ९ सुवर्ण, ५ रौप्य आणि ४ कांस्यपदकांची कमाई केली.

या राष्ट्रीय स्पर्धेत श्रीयांश कैथवास, प्रिन्स दासरवार, प्रेम सोलाम, श्रीओम घोष, सिद्धांत पेटकर, सुहाना धुळे, ऋतुजा चोपावार, प्राची वासेकर, क्रिस्टल बिलोरिया, आरोही कैथवास, पंखुडी गावंडे, काशवी कन्नके, परी घोष, नैनिशा पिंपळे आणि प्रभा गोगुला बचोने यांनी सहभाग घेत पदकांची मोहोर उमटविली.

स्पर्धेच्या वेळी शोतोकान कराटे-डो इंडियन असोसिएशनचे शिहान विनोद कुमार वर्मा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विविध राज्यांतील खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले होते.

खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शोतोकान कराटे-डो असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रशांत भास्कर पिंपरी, गुलाम अहमद शेख, शमशीर शेख, सिंधु कुशवाहा, मनोज डे, स्वप्नील डंभारे, सूरज सर आणि सोनम कुशवाहा यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.





  Print






Related Photos