गडचिरोली - नागपूर बसची निर्माणाधिन पुलाला धडक, अनेक प्रवासी जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / ब्रम्हपुरी :
गडचिरोली - नागपूर बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने निर्माणाधिन पुलाला बसची धडक बसून बसमधील जवळपास ४० प्रवासी जखमी झाल्याची घटना काल २८ मे रोजी घडली आहे.
सदर अपघात गडचिरोली - नागपूर महामार्गावरील किन्ही गावाजवळ घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ब्रम्हपुरी आगाराची एमएच ४० वाय ५२१३ क्रमांकाची बस गडचिरोली येथून नागपूरकडे जात होती. या मार्गाच्या निर्मितीचे काम सुरू असून रस्ता दूभाजक, नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. अशाच बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाच्या कठड्याला बसची जबर धडक बसली. यामध्ये प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-30


Related Photos