महत्वाच्या बातम्या

 जे २७ वर्षामध्ये काम करू शकले नाही ते आता श्रेय घेण्याचे काम करीत आहेत : आ. विनोद अग्रवाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : अडीच वर्षापासून गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये सातत्याने विकास कामांची चळवळ सुरू आहे. आमदार विनोद अग्रवाल हे मुंबई स्तरावर पाठपुरावा करून मतदारसंघातील रखडलेले तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून असे बरेच योजना त्याने गोंदिया विधानसभा मध्ये सुरू केले आहे. व त्यांच्या संकल्पनेने गोंदिया मतदारसंघात शेतकऱ्यांना धान खरेदी विक्री करण्यासाठी फारच अडचणीचा सामना करावा लागत होते परंतु नुकताच आमदारकीचे जबाबदारी हाताळता त्यांनी गाव तिथे गोदाम या संकल्पनेने विधानसभेतील प्रत्येक गावात कृषी गोदाम बनविण्याचे निर्णय घेतला शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाण्याची व गोंदिया शहर वासियांना पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री ते आजी मुख्यमंत्री पर्यंत सातत्याने पाठपुरावा करून डांगोरली बैरेज च्या कामाला मंजुरी आणून दिले. विधानसभा क्षेत्रातील अनेक ठिकाणी अनेकदा एकच कामाचे दोन ते तीन वेळा भूमिपूजन झाले होते. परंतु बोर्ड लावून ते काम निरस्त होते आमदारकीची जबाबदारी हाती घेताच आमदार विनोद अग्रवाल यांनी एका गावामध्ये अंदाजे एक कोटी ते दहा कोटी पर्यंत सुमारे निधी आमदार यांच्यातर्फे देण्यात आली आहे व यांनी पुढील दोन वर्षांमध्ये अनेक विकास कामाकरिता मुंबई स्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याची आम्ही सुद्धा दिली आहे.

गोंदिया विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या फुलचुरटोला येथे 10 लक्ष, अदासी येथे 10 लक्ष, अदासी ते पोवारीटोला करिता 15 लक्ष, तुमखेडा खुर्द येथे 10 लक्ष, दत्तूरा येथे 10 लक्ष, मोगरा येथे 25 लक्ष, एकूण अंशी लक्षात घ्या विकास कामांचे भूमिपूजन आंदोलन विनोद अग्रवाल यांच्या माध्यमातून मंजूर झाले असून त्या कामाचे भूमिपूजन युवा नेते रोहित अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले, व काही दिवसांमध्ये अनेक कामाचे भूमिपूजन हे कामासह सुरू होणार आहेत.

सदर भूमिपूजनाच्या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने भाऊराव उके अध्यक्ष जनता की पार्टी, छत्रपाल तूरकर, ग्रामीण तालुका अध्यक्ष, मोहन गौतम जिला अध्यक्ष किसान आघाडी, मुनेश रहांगडाले सभापति पंचायत समिति गोंदिया, युवा नेता रोहित अग्रवाल, लखन हरिनखेडे जिला परिषद प्रमुख पांजरा, चेतन बहेकार महामंत्री, ममता शेखर वाले जिला परिषद सदस्य, वैशाली जिला परिषद सदस्य, सोनुला बरेले पंचायत समिति सदस्य, मीनाक्षी बारलिंगे, पंचायत समिति सदस्य,कोमल धोटे सरपंच फूलचूरटोला दिलीपसिंह मुंडेलें, श्याम कावडे, भारती गावंडे, दिलीप खंडेलवाल,अनिल शरणागत, बाबा चौधरी, रामदयाल रहागडाले, नीलकंठ मानकर, शेखर वाढवे, हेमंत हीरापुरे, रवि नोतानी, गंगाराम बावनकर, शोभा नंदेश्वर सरपंच तुमखेड़ा खुर्द प्रह्लाद बन्नोटे उपसरपंच तुमखेड़ा खुर्द, रवि पंधरे सरपंच अदासी किरण चौधरी सरपंच पोवारीटोला, उर्मिला महारवाड़े सरपंच दत्तोरा व रामू चुटे उपसरपंच,रोशन पाथोड़े खेमेंद्र पंधरे, मुकेश हरिनखेडे व इत्यादि कार्यकर्ता उपस्थित होते. 





  Print






News - Gondia




Related Photos