महत्वाच्या बातम्या

 निवृत्तीवेतनाचे प्रकरणे निकाली काढण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : पेंशनधारकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी तसेच नामंजूर, आक्षेपित झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन प्रकरणे निकाली काढण्यासाठी विभागप्रमुखांना मार्गदर्शन करण्याकरीता ११ सप्टेंबर रोजी ऑनलाईन कार्यशाळा तथा पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन कार्यशाळेस सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित ऑनलाईन कार्यशाळा तथा पेंशन अदालतीच्या ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते होणार आहे. 

यावेळी सकाळी १०.१५ वाजता शिक्षण विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वन विभाग, सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसिल कार्यालय, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, कृषि विभाग, भूमी अभिलेख  विभाग, मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तर दुपारी २.३० वाजता मुद्रांकांचे निबंधक, जिल्हा व सत्र न्यायाधिश, नगर रचना विभाग, सैनिक कल्याण विभाग, पोलिस विभाग व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे.

यासाठी सर्व आहारण व संवितरण अधिकारी व संबंधित निवृत्ती वेतनधारकांनी येत असलेल्या अडचणी व समस्या विहित विवरणपत्रात ई-मेल व्दारे ७ सप्टेंबर पर्यंत पाठवाव्यात, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos