मारकबोडी ते डोंगरगाव रस्त्याचे डांबरीकरण चालु करण्यात यावे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी  /गडचिरोली :
तालुका मुख्यालयापासून १५ किलामिटर अंतरावर असलेल्या मारकबोडी ते डोंगरगाव रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याबाबात मारकबोडी ते डोंगरगाव मुख्या रस्त्याचे डांबरीकरण  मुख्यमंत्री ग्रामसडक योजणे अंतर्गत मंजूर असुण सुध्दा ठेकेदार दुर्लक्ष करीत आहेत. मारकबोडी ते डोंगरगाव रस्ता ३. ५० किलोमिटर आहे तेथील नागरिकांना जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यामुळे राज्य परिवहन महामंडळ गडचिरोलीच्या बस सुध्दा बंद झाल्या आहे. त्यामुळे विद्यार्थी यांचेवर शिक्षणाची टांगती तलवार झाली आहे. मानव विकास मिशन अंतर्गत बस सेवा सुरू असल्यामुळे मारकबोडी ते गडचिरोली येथे शाळा महाविद्यालयात विद्यार्थी  शिक्षण घेत आहे.तरीपण मागिल ४ वर्षापासून या रस्त्याचे बांधकाम करण्यास दिरंगाई सुरू आहे. संबंधीत बांधकाम विभागाने यांची दखल घेवून येत्या २ दिवसांत डांबरीकरणास सुरूवात करण्यात यावी अशी मागणी मारकबोडीचे सरपंच रविना रोहणकर व उपसरपंच रूपेश चुधरी यांनी पत्रकातून व्यक्त केली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-26


Related Photos