महत्वाच्या बातम्या

 जलजीवन मिशन योजना ही जनतेच्या लाभदायी प्रत्येक गावांनी लाभ घेऊन चांगला उपयोग करावा : खासदार अशोक नेते


- जल जीवन मिशन ही केंद्र शासनाची पुरस्कृत व महत्वांकाक्षी योजना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपुर : जल जिवन मिशन अंतर्गत ग्रा.पं. लाखापुर ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपुर या गावातील प्रत्येक घरात वैयक्तिक १००% नळजोडणी झाल्याने प्रधानमंत्री यांचे कडून अवॉर्ड प्राप्त झाल्याने खासदार अशोक नेते व माजी आमदार अतुल देशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार व अभिनंदन कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय लाखापुर येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी मंचावर प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, माजी आमदार तथा लोकसभा संयोजक प्रा. अतुल देशकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, सरपंच्या चंद्रकला मेश्राम, उपसरपंच सौ‌मालन गायकवाड, ब्रम्हपुरी भाजपा शहराध्यक्ष अरविंद नंदुरकर, ओबीसी मोर्चा चे शहराध्यक्ष प्रा. सोलोटकर, नगरसेवक मनोज वठठे, प्रसिद्धी प्रमुख संजय लांबे, ग्रा.प. सचिव  भुमेशवर हुमे,  ग्रा.प. सदस्य श्रावण दुधकुळे, ग्रा.प. सदस्या निला राऊत, लता कुथे, जयपाल राऊत, हरीचंद बनकर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या आयोजित कार्यक्रमा प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना घरगुती नळ जोळणी प्रकल्प केंद्र शासनाची पुरस्कृत योजना जलजीवन मिशन हर घर जल, हर घर नल या योजनेचा लाभ प्रत्येक गावांनी घ्यावा. पाणी हे जीवन आहे. पाण्यासाठी अनेक गावांतील, शहरातील ग्रामीण भागांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. परंतु विहीरी, बोरवेलद्वारे शुद्ध पाणी मिळत नव्हता, अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ अनेक बिमारीचा सामना करावा लागत होता. यासाठी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर नल, हर घर जल हि योजना आणली. 

या योजनेअंतर्गत नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी या योजनेचा उद्देश असुन या योजनेद्वारे प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे. हा योजनेचा उद्देश आहे यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत लाखापुर या गावातील प्रत्येक वैयक्तिक १००% नळ जोळणी  झाल्याने या देशाचे विश्वगौरव, पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याकडून लाखापुर या गावातील ग्रामपंचायत अवॉर्ड प्राप्त झाले ही आनंदायी बाब आहे. हा अवॉर्ड दिल्ली येथील केंद्रीय जल मंत्री गजेंद्र जी शेखावत, यांच्या हस्ते सरपंच्या चंद्रकला मेश्राम यांना सुपूर्त करण्यात आला. केंद्र शासनाच्या विकास कामासाठी सातत्याने माझा सुद्धा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी याप्रसंगी केले.

पुढे बोलतांना खासदार महोदयांनी आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर या छोटयाशा गावांनी सदर जलजीवन मिशन योजनेत ग्रामपंचायतीने अवॉर्ड प्राप्त केला. ही कौतुकास्पद,गौरवशाली बाब आहे, जलजीवन मिशन योजना ही जनतेच्या लाभदायी. प्रत्येक गावांनी लाभ घेऊन, चांगला उपयोग करावा, असे प्रतिपादन यावेळी केले.

माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी बोलतांना, या गावात जनतेच्या सहकार्याने लोकसहभागाने हा अवॉर्ड प्राप्त झाला, या गावात पिण्याच्या पाण्याची आवश्यकता होती. ती आता दूर झाली. आपल्या गावातील प्रगती कशी करावी. यासाठी एकत्र यावे व आपल्याला हा अवॉर्ड प्राप्त झाल्याबद्दल मान पंतप्रधान मोदी यांनी समर्थन देऊन त्यांचे धन्यवाद म्हणावेत असे, यावेळी अतुल यांनी वक्तव्य केले.

सरपंच चंद्रकला मेश्राम यांनी आपल्या या छोट्याशा गावात माननीय खासदार अशोक नेते व माजी आमदार अतुल देशकर यांनी कार्यक्रमाप्रसंगी आले. आमचा सत्कार व अभिनंदन केल ही आमच्या गावासाठी गौरवाची, आनंदाची अभिमानास्पद बाब आहे, असे यावेळी बोलल्या.

या कार्यक्रमाच्या निमित्याने फळबाग वाटिका येथे भेट दिली. या फळबाग वाटिकेत सिताफळ, करवंद, केळी, तसेच असे अनेक प्रकारचे झाडे आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos