महत्वाच्या बातम्या

 परिवहन विभागाच्या शिबिरास उत्तम प्रतिसाद : दुसऱ्या दिवशी १६७ वाहन चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील प्रवासी बस चालकांसाठी नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला दुसऱ्या दिवशी देखील उत्तम प्रतिसाद लाभला. दुसऱ्या दिवशी जिल्हाभरातील १६७ चालकांनी आपली नेत्र व आरोग्य तपासणी करून घेतली.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत राज्यात होणाऱ्या गंभीर अपघातात बसेसच्या अपघातामध्ये होणारी जीवितहानी सर्वाधिक आहे. चालकाचे संपूर्ण आरोग्य तसेच वाहन चालकाच्यादृष्टीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. चालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी असेल तर वाहन चालविताना अडचणी निर्माण होतात, परिणामी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्व प्रकारच्या बस चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी केली जात आहे. दृष्टीदोष असणाऱ्या बॅच धारक चालकांना निशुल्क चष्म्याचे वितरण केले जाणार आहे.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी १६७ वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे कामकाज डॉ. खुबनानी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. नेत्र चिकित्सा तपासणी करण्याकरिता डॉ.मनोज सक्तेपार यांच्या मार्गदर्शनात अनिल वरघट, अश्विनी गावंडे, किशोर मेश्राम व प्रफुल काकडे यांनी काम पाहिले तर एनसीडी विभागात डॉ. माधुरी निमसटकर यांच्या मार्गदर्शनात गीता लाडे, मंजुषा पाटील, मितला गोहाडे माधुरी लोखंडे, अश्विनी आसुटकर, वैशाली साबळे, सुकांत येसनकर, कृष्णा ताटे यांनी काम पाहिले.

शिबिराच्या यशस्वीतेकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनात मोटर निरीक्षक मेघल अनासाने, तुषारी बोबडे, गोपाल धूर्वे, साधना कवळे, विशाल मोरे, सहायक मोटर निरीक्षक मंगेश राठोड अनुराग सालंकर, विशाल भगत, निखिल कदम, अमर पखान, आदित्य ढोक, श्रीकांत येवले, लिपिक सुनील शिरसाठ, रामेश्वर इंगोले, संदीप घोडे, शाम संगारे, वाहन चालक पांडुरंग वाघमारे, घनश्याम टिकस, नरेंद्र तिवारी यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Wardha




Related Photos