एमआयएम नगरसेवक तौफिक शेख विरोधात विनयभंगाची तक्रार दिलेल्या महिलेची हत्या


वृत्तसंस्था / सोलापूर  : एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिलेल्या आणि  गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रेश्मा पडनेकुर यांची हत्या झाली आहे. सोलापूरच्या विजयपूर परिसरात त्यांच्या मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  
१७  एप्रिल रोजी रेश्मा यांनी सोलापूरचे एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती. तक्रार दिल्यापासून रेश्मा या बेपत्ता होत्या. काल रात्री  विजयपूर जवळील कोलार गावात त्यांच्या मृतदेह सापडला. रेश्मा यांच्या हत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रेश्मा यांच्या अशा मृत्यूमुळे संशयाची सुई एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांच्यावर आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौफिक शेख आणि रेश्मा यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. त्यामुळे तौफिक शेख यांच्या पत्नीनेदेखील रेश्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
ज्यावेळी ही तक्रार करण्यात आली त्यादिवसापासून रेश्मा या बेपत्ता होत्या. पोलीस त्यांचा शोध घेत होते. पण गुरुवारी रात्री त्यांचा मृतदेह सापडल्याने घटनेला वेगळं वळण लागलं आहे.  पोलिसांनी रेश्मा यांचा मृतेदह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर या प्रकरणात पोलीस आता प्रत्यक्षदर्शींपासून ते तौफिक शेख यांचीही चौकशी करणार असल्याची माहिती  आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-05-17


Related Photos