महत्वाच्या बातम्या

 सर्व आस्थापनांनी तातडीने माहिती उपलब्ध करा : जिल्हाधिकारी


- जिल्हा विकास आराखडा समितीची सभा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जागतिक बँकेच्या प्रतिनिधी सोबतच्या २९ ऑगस्टच्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हा विकास आराखडा जिल्हास्तरीय बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपापल्या आस्थापनांची योग्य माहिती सादर करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

देशाच्या अमृत महोत्सवानिमित्य भारताला २०१७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.

भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) या उपक्रमात समन्वयकाची भूमिका निभावत असून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्याची माहिती संकलित केली जात आहे.

आजच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आस्थापनांनी आपापली योग्य माहिती आयआयएमने दिलेल्या आराखड्यामध्ये भरून तातडीने पाठवावे असे स्पष्ट केले.

२९ ऑगस्टला जागतिक बँकेचे प्रतिनिधी राज्याला भेट देणार असून विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांसोबत प्रतिनिधी संवाद साधणार आहे. तत्पूर्वी यासंदर्भात सर्व आवश्यक माहिती देण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी इंग्रजी भाषेमध्ये आपली माहिती भरून पाठवावी व या संदर्भात कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांच्याशी संपर्क सादर याची सूचना यावेळी करण्यात आली.





  Print






News - Nagpur




Related Photos