लघु पाटबंधारे विभागाचा कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहाय्यकावर एसीबीची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
मागेल त्याला विहीर योजनेंतर्गत बोरवेलच्या बिलाच्या रक्कमेचा प्रस्ताव तयार करून पाठविल्याचा मोबदला म्हणून दोन हजारांची लाच स्वीकारणारे जि.प. लघुपाटबंधारे उपविभाग अर्जुनी मोरगाव येथील कनिष्ठ अभियंता व कनिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.क्र. शशिकांत पुंडलिक काळे, कनिष्ठ अभियंता व वसंत भिवा भोंडे, कनिष्ठ सहाय्यक, दोन्ही उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय , लघु पाटबंधारे (जि.प.), उपविभाग, अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया अशी लाचखोरांची नावे आहेत.  
तक्रारदार हे निलज तह. अर्जुनी/मोरगाव येथील रहीवासी असुन शेतकरी आहे. त्यांना ‘मागेल त्याला सिंचन विहीर’ योजने अंतर्गत सन २०१६ - १७ मध्ये पंचायत समिती, अर्जुनी मोरगाव येथुन विहीर मंजुर झाली होती. या योजनेअंतर्गत विहीरीचे खोदकाम/बांधकाम पुर्ण झाले असुन विहीरीमधील बोअरवेलचे काम बाकी होते. विहीरीच्या संपुर्ण कामाकरीता मंजुर निधीपैकी उर्वरीत बोअरवेल बिलाच्रूा रक्कमेबाबत विचारपुस करण्याकरीता तक्रारदार  लघु पाटबंधारे (जि.प.), उपविभाग, अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया येथे गेले असता कनिष्ठ अभियंता शशिकांत काळे  यांनी तक्रारदाराचे नावे मंजुर असलेल्या विहीरीतील बोरवेलच्या बिलाच्या रकमेचा प्रस्तव तयार करुन पंचायत समिती अर्जुनी/मोरगाव येथे पाठवल्याचा मोबदला म्हणुन दोन हजार रूपये लाच रकमेची मागणी केली.  तक्रारदाराची लाच देण्याची  ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार नोंदविली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून काल १६ मे रोजी  सापळा कार्यवाहीचे आयोजन केले असता सापळा कार्यवाही दरम्यान शशिकांत  काळे  यांनी आपले  पदाचा दुरुपयोग करुन तक्रारदाराचे नावे मंजुर असलेल्या विहीरीतील बोरवेलच्या बिलाच्या रकमेचा प्रस्ताव तयार करुन पंचायत समिती अर्जुनी/मोरगाव येथे पाठविल्याचा मोबदला म्हणुन  लाच रक्कमेची मागणी करून  कनिष्ठ सहाय्यक वसंत भोंडे  याच्या हाताने स्विकारली. त्यावरून दोन्ही आरोपींविरूध्द पोलिस ठाणे मोरगाव, जि. गोंदिया येथे लाचलुचपत प्रतिबंध कायदा १९८८ अन्वये गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. 
सदर कार्यवाही  पोलिस उपायुक्त, पोनिस अधीक्षक श्रीकांत धिवरे  (अतिरिक्त कार्यभार) ,  अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार,  यांचे मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस हवालदार प्रदिप तुळसकर, नापोशि राजेश शेंद्रे,  डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, रंजित बिसेन, मनापोशि गिता खोब्रागडे, व चालक देवानंद मारबते यांनी केली आहे.

   Print


News - Gondia | Posted : 2019-05-17


Related Photos