महत्वाच्या बातम्या

 नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १.०० ते २.०० या वेळेत जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकशाही दिनाकरीता नागरिकांकडून ७ नोव्हेंबर दुपारी १२.०० वाजेपर्यंत तक्रार आणि निवेदन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. तक्रार अर्ज दाखल केलेले नागरिक हे व्यक्तिशः लोकशाही दिनात सहभागी होतील. लोकशाही दिनात सादर करावयाचे तक्रार अर्ज, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील तक्रार अर्जावर एका महिन्यात कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करावा. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे. नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास यांच्यामार्फत नागपूर महानगरपालिका आयुक्त व सभापती, नागपूर सुधार प्रन्यास यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्रपणे लोकशाही दिनांचे आयोजन त्यांच्या कार्यालयात करण्यात येत असल्यामुळे या कार्यालयांशी संबंधित तक्रारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनात न दाखल करता संबंधित कार्यालयात आयोजित होत असलेल्या लोकशाही दिनात सादर करण्यात यावे.
लोकशाही दिनात न्याय प्रविष्ठ प्रकरणे, राजस्व / अपील प्रकरणे, न्यायालयीन प्रक्रियेचे अंतर्भाव असलेली प्रकरणे, सेवा विषयक, नोकरी विषयक व आस्थापना विषयक प्रकरणे, कार्यालय प्रमुख्याने अंतिम उत्तरे दिलेली प्रकरणे, आवश्यक कागदपत्राच्या प्रती न जोडलेल्या प्रकरणांविषयीचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos