जून महिना पावसाच्या दृष्टीने कोरडाच राहण्याची शक्यता : स्कायमेट


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :   केरळमध्ये पाऊस वेळेवर म्हणजे ४ जून रोजी दाखल होण्याचा अंदाज असून  दोन दिवसांनी पुढे मागे होऊ शकतो . मात्र हा पाऊस बराच काळ केरळमध्येच रेंगाळणार असल्याने महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब असे स्कायमेट ने म्हटले आहे.  जून महिना हा पावसाच्या दृष्टीने कोरडाच राहणार असल्याची शक्यताही स्कायमेटने वर्तवली आहे.
 ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होता - होता पाऊस राज्यभर सक्रीय होईल असा अंदाज आहे. मात्र पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहणार असल्याचा स्कायमेटने पुनरुच्चार केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी असेल असे आज जाहीर केलेल्या अंदाजात सांगण्यात आले आहे. जून ते सप्टेंबदरम्यान किती पाऊस पडेल याबाबतचा पहिला अंदाज स्कायमेटने याआधीच जाहीर केला आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा स्कायमेटचा अंदाज आहे. सरासरीच्या ९३ टक्के इतकाच पाऊस पडेल असे या हवामान विभागाने म्हटले आहे.
 यंदा देशभरात समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज भारतीय  हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या वर्षीही हवामान विभागाने ९७ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता, परंतु प्रत्यक्षात ९१ टक्के पाऊस झाला होता. जून ते सप्टेंबर या काळात ९० ते ९५ टक्के मान्सूनचा पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा कमी तर ९६ ते १०४ टक्के पाऊस म्हणजे सरासरी पाऊस मानला जातो. यंदा देशाच्या काही भागांत मे ते जूनदरम्यान तापमान ०.५ डिग्रीने वाढेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.  Print


News - World | Posted : 2019-05-14


Related Photos