महत्वाच्या बातम्या

 मेरी माटी मेरा देश या अभियानातंर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन


- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत असणार विविध मान्यवरांची उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष समारोपाच्या निमित्याने मेरी माटी मेरा देश अभियानातंर्गत सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्य महोत्सवाचा समारोप म्हणून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मेरी माटी मेरा देश मिट्टी को नमन, विरों का वंदन हा उपक्रम मोठया उत्साहाने जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. मातीला केंद्रबिंदू ठेवून कार्यक्रम साजरा करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. जिल्ह्यात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान पंचसुत्री कार्यक्रमअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर शिलाफलकम ऊभारणे, पंचप्रण शपथ, वसुधा वंदन अतंर्गत प्रत्येक गावात वृक्ष लागवड, विरों का वंदन अंतर्गत स्वांतत्र्य सैनिकांना नमन करणे तसेच  ध्वजारोहण करुन राष्ट्रगिताचे गायन आदी कार्यक्रम राबविन्यात आले.

या अभियानाचा जिल्हास्तरीय समारोप कार्यक्रम २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम उद्यान, बल्लारपूर रोड, चंद्रपूर येथे करण्यात येत आहे. तसेच सांस्कृतिक कार्य विभागाकडून मेरी माटी, मेरा देश साद सह्याद्रीची,भूमी महाराष्ट्राची या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ६ वाजता चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमास वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, लोकसभा सदस्य अशोक नेते, आ. रामदास आंबटकर, अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया, सुभाष धोटे, किशोर जोरगेवार, प्रतिभा धानोरकर तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन तसेच महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल यांची उपस्थिती असणार आहे.

नागरीकांनी यामध्ये सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos