महत्वाच्या बातम्या

 बॅच बिल्ला असलेल्या वाहनचालकांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने बॅच बिल्ला असलेल्या वाहनचालकांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या वाहन चालकांकडे बॅच बिल्ला आहे, अशा वाहन चालकांनी या शिबिरात उपस्थित राहून आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत राज्यामध्ये होणाऱ्या गंभीर अपघाताचे विश्लेशन केल्यास बसेसच्या अपघातामध्ये होणारी जिवीत हानी सर्वाधिक आहे. ही हानी टाळण्यासाठी वाहन चालकांचे संपूर्ण आरोग्य तसेच वाहन चालकाच्या दृष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे. चालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी अथवा दृष्टीदोष असेल तर वाहन चालवितांना अडचणी येत असतात. परिणामी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता सर्व प्रकारच्या बसचालकांची आरोग्य व नेत्र तपासणी होणे आवश्यक आहे. यासाठी परिवहन विभागाच्यावतीने वाहन चालकांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सामान्य रुग्णालय वर्धा येथील नेत्र विभाग येथे २३ व २४ ऑगस्ट रोजी, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे २५ व २६ ऑगस्ट रोजी व उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मो. समीर मो. याकूब यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos