महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे श्रमदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आपले कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसावा या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. विविध शासकीय कामाच्या निमित्ताने नागरिकांची, अभ्यागंताची सतत येजा सुरू असते. त्यामुळे त्यांना या परिसरात आल्यावर स्वच्छ व प्रसन्न वाटावे, या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून श्रमदान करण्यात आले. जिल्ह्यातील इतरही कार्यालयांनी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos