डीजे वाजविण्यास ब्रेक : घाटंजी पोलिसांचा गणेशोत्सवासाठी रूट मार्च


- गणेश विसर्जन डीजे - मुक्त करण्यावर भर, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी घाटन्जी पोलिसांचे पथसंचलन
विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घाटंजी पोलिसांनी सोमवारी, २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातून पथसंचलन केले. गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि डीजे - मुक्त पद्धतीने पार पाडण्यावर पोलीस प्रशासनाचा भर राहणार आहे. पोलीस स्टेशन चौकातून सुरू झालेले पथसंचलन जुना बसस्थानक, जामा मशीद रोड, शिवाजी चौक मार्गे पुन्हा पोलीस स्टेशन येथे पोहोचले. या रूट मार्चच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखण्याचा संदेश देण्यात आला.
गणेश विसर्जनाच्या वेळी डीजेच्या मोठ्या आवाजामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शांततेत व उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन ठाणेदार, व तथा पोलीस निरिक्षक केशव ठाकरे यांनी केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, पांढरकवडा येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक, व तथा उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन पार पडले.
यावेळी ठाणेदार, व तथा पोलीस निरीक्षक केशव ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राठोड यांच्यासह पोलीस उप निरिक्षक, पोलीस शिपाई, पोलीस कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा - सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे या पथसंचलनातून स्पष्ट झाले आहे.




Petrol Price




