महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषदेत ३२० रिक्त पदांची सरळसेवेने भरती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा परिषद भंडारा येथील विविध विभागांमधील गट-क संवर्गातील एकूण ३२० रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येत आहे. या मध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ट सहायक (लिपीक), कनिष्ठ सहायक (लेखा), पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ट सहायक (लिपीक), वरिष्ट सहायक (लेखा), विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (सांख्यीकी), स्थापत्य अभियांत्रीकी सहायक, अंगणवाडी पर्यवेक्षीका ही पदे असून या रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी ५ ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत असणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर २५ ऑगस्ट २०२३ रोजीच्या रात्री २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. रिक्त पदांचा तपशिल पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जिल्हा परिषद भंडाराच्या www.bhandarazp.org या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे.

सदर पदभरती संदर्भात अडचणी किंवा समस्या उदभवल्यास हेल्प लाईन क्रमांक ०१७८४-२५२२६२ व हेल्प लाईन E-mail ID :- zpbhandararecruitment2023@gmail.com यावर संपर्क साधावा.





  Print






News - Bhandara




Related Photos