महत्वाच्या बातम्या

 बोगस डॉक्टर आढळल्यास नागरिकांनी त्यांची तक्रार करावी


- जिल्हा प्रशासनाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : बोगस वैद्यकीय व्यवसायीकांवर आळा घालण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची सभा नुकतीच पार पडली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही बैठक घेण्यात आली.

या सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुवर, उपजिल्हा पोलीस अधिक्षक नितीन चिंचोलकर, सहाय्यक आयुक्त (औषधी) अन्न व औषध प्रशासन अभि चौवरडोल व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.जी नैातामे, डॉ. सी डब्लु.वंजारे आदी सदस्य उपस्थित होते.

ग्रामीण भागातील नागरिकांवर योग्य अर्हता नसतांनाही बोगस डॉक्टर नागरिकांचे उपचार करत असून त्यांची फसवणूक करित असतात. त्या मुळे नागरिकांच्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम होत असतो. बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यात असलेल्या बोगस डॉक्टरांचा शोध घ्यावा. यासाठी पोलीस विभागाची मदत यावी अशा सुचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुवर यांनी बोगस डॉक्टर संबंधात उपलब्ध असलेली तालुकानिहाय ११३ बोगस डॉक्टरांची यादी यावेळी सभेपुढे सादर केली. संबंधीत तालुका वैद्यकीय अधिकारी व शहरी भागातील संबंधितांनी बोगस डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करावी व इतर संबंधीत कागदपत्र तपासून घ्यावे, तसेच तालुक्यात यांच्या व्यतिरिक्त काही अधिक बोगस डॉक्टर असल्यास त्यांची माहिती सभेत सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधीत विभागांना दिले.

जिल्हयातील बोगस डॉक्टरांवर गत कालावधीत झालेल्या कार्यवाहीमध्ये सन २०१८ मध्ये २ प्रकरणे पोलीस स्टेशन भंडारा व साकोली येथे सुरु असल्याबाबत पोलीस विभागातर्फे सांगण्यात आले. संशयात्मक तपासणी करणारे बोगस डॉक्टर आढळल्यास नागरिकांनी त्यांची तक्रार पोलीस विभाग किंवा जिल्हा प्रशासनाकडे करण्याचे आवाहन कुंभेजकर यांनी केले.





  Print






News - Bhandara




Related Photos