महत्वाच्या बातम्या

 जागतिक बाल तस्करी विरोधी दिन जनजागृती कार्यक्रम चे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : मानवी तस्करी विरुद्ध जनजागृती करण्याच्या उद्देशाने  जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन चे आयोजन रेल्वे स्टेशन, बल्हारशाह येथे ३० जुलै रोजी करण्यात आले.
जनमानसात जनजागृती करून शिक्षित करण्यासाठी होता जेणेकरून महिला आणि बालकांना सक्तीच्या मजुरीपासून वाचवता येईल आणि वेश्याव्यवसाय पासून वाचवता येईल.

असेस टू जस्टिस प्रोजेक्ट चंद्रपूर, हृदया संस्था गडचिरोली, रेल्वे चाइल्ड लाईन बल्लारपूर, जिल्हा चाईल्ड लाईन चंद्रपूर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त रेल्वे स्टेशन बल्लारशाह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मानवी तस्करी प्रतिबंधक मोहीम व रॅली, पोस्टर बॅनरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमात आर.डी.नंदनवार स्टेशन व्यवस्थापक, रेल्वे स्टेशन, बल्हारशाह, अजय साखरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, चंद्रपूर, सुनील पाठक, आरपीएफ निरीक्षक, प्रवीण गाडवे, आरपीएफ उपनिरीक्षक, देवानंद मंडलवार, जीआरपी कॉन्स्टेबल, रवी मिश्रा, सीसीआय, के. के. सेन, सीसीआय, अभिषेक मोहुर्ले, समन्वयक, डीसीएल,नरेश मेकलवार, प्रकल्प व्यवस्थापक, सुरेंद्र धोडरे, धर्मेंद्र मेश्राम, रेल्वे चाइल्ड लाईन टीम बल्हारशाह आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत मोकासे यांनी तर आभार प्रदर्शन नरेश मेकलवार यांनी केले.






  Print






News - Chandrapur




Related Photos