महत्वाच्या बातम्या

 नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात रात्री सर्वत्र सततधार पाऊस झाला आहे. नदी नाल्यांना पुर आल्याने ग्रामीण भागातील काही मार्ग बंद पडले आहे. हवामान विभागाने पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

काल रात्रभर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. रात्रीच्या पावसामुळे काही ठिकाणी रस्ते बंद पडले आहे. काही ठिकाणी पुलांचे नुकसान झाल्याने वाहतूकीस अडथडा निर्माण झाला आहे. अशा स्थितीत वाहतूक करणे धोक्याचे आहे.

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी आज २७ जुलै रोजी रेड अलर्ट जारी केला असून मोठ्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सुरक्षा उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos