लोकसभा निवडणुक : पहिल्या टप्प्यातील ९१ जागांसाठी झाले मतदान


वृत्तसंस्था / नवीदिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यामध्ये १८ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील ९१ जागांसाठी आज ११ एप्रिल रोजी  मतदान पार पडले आहे. सर्वाधिक ८१. ८ टक्के मतदान त्रिपुरा राज्यात   आणि ८१ टक्के मतदान प. बंगालमध्ये झाल्याचे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये  सांगितले.

पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सात मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी 

वर्धा - ५५ टक्के, रामटेक – ५२ टक्के, नागपूर – ५३ टक्के, भंडारा- गोंदिया ६० टक्के, गडचिरोली-चिमूर ६१ टक्के, चंद्रपूर- ५६ टक्के, यवतमाळ-वाशिम ५४ टक्के.

विविध राज्यांमध्ये झालेल्या मतदानाची आकडेवारी  

सिक्किम – ६९ टक्के, मिझोराम – ६० टक्के, नागालँड – ७८ टक्के, मनिपूर – ७८.२ टक्के, त्रिपुरा – ८१.८ टक्के, आसाम – ६८ टक्के, प. बंगाल – ८१ टक्के, अंदमान आणि निकोबार – ७०.६७ टक्के, आंध्र प्रदेश – ६६ टक्के, छत्तीसगड – ५६ टक्के, तेलंगणा – ६० टक्के, उत्तराखंड – ५७.८५ टक्के, जम्मू-कश्मीर – ५४.४९ टक्के (अंतिम  आकडेवारी आल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढू शकतो)  Print


News - World | Posted : 2019-04-11


Related Photos