भामरागड तालुक्यात ५७.६२ टक्के मतदान


- २७ मतदान केंद्रांवरून मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत भामरागड तालुक्यातील ५७.६२  टक्के मतदारांनी भाग घेतला. मतदानासाठी तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे तालुक्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
भामरागड तालुक्यातील २७ मतदान केंद्र असून २० हजार ५३२ मतदार आहेत. यामध्ये ९ हजार ५८५ पुरूष आणि १० हजार ९४४ महिला मतदारांचा समावेश आहे. यापैकी ६  हजार ५२३ पुरूष आणि ५  हजार ३०९ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण ११ हजार ८३२ मतदारांनी मतदान केले. 
तालुक्यातील हिदूर मतदान केंद्रावर ७५.५  टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले आहे. तर इरकडुम्मे येथील मतदान केंद्रावर ६९ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. भामरागड येथील १८५ क्रमांकाच्या बुथवर ५४.६६  टक्के, भामरागड येथील १८६ क्रमांकाच्या बुथवर ५६.५१  टक्के, हेमलकसा येथे ६७.१ टक्के, कियर येथे ६२.६५  टक्के, आरेवाडा येथे ६१.४१  टक्के, ताडगाव येथे ६७.६६  टक्के, पल्ली येथे ५४.८७  टक्के, इरकडुम्मे येथे  ६९.२ टक्के, चिचोडा येथे ४८ टक्के, कुडकेली येथे ५१.५६ टक्के, मन्नेराजाराम येथे ६६.७  टक्के, मडवेली येथे ५२.९ टक्के, वामनपल्ली येथे ६५.२५  टक्के, येचली येथे ७२.९७ टक्के, लाहेरी येथे ६५.२३  टक्के, बिनागुंडा येथे १२.३२ टक्के, मलमपोड्डूर येथे ५४.८६ टक्के, होडरी येथे ६५.३७  टक्के, धोडराज येथे ५९.८३  टक्के, गोंगवाडा येथे ३३.९८ टक्के, नेलगुंडा येथे ४३.7१ टक्के, भटपार येथे १८.९३ टक्के, गोलागुडा येथे ४८.५४ टक्के, नारगुंडा येथे ६८.२ टक्के, कोठी येथे ६६.१२ टक्के, पोयार कोठी येथे ५७.८  टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-11


Related Photos