महत्वाच्या बातम्या

 आजपासून ज्ञानवापीचे होणार शास्त्रीय सर्वेक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराजवळील ज्ञानवापी मशिदीचे आज सोमवारपासून वैज्ञानिक किंवा एएसआय अर्थात हिंदुस्थानी पुरातत्त्व विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

वजुखाना वगळता हे सर्वेक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. वजुखाना येथे शिवलिंग असल्याने वजुखाना वगळता संपूर्ण ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती.

हा परिसर सील करण्यात आला असून याबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट आहे. १४ जुलै रोजी ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी करणाऱ्या हिंदू पक्षकारांच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली होती. त्यावेळी न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता.





  Print






News - World




Related Photos