महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीस दलाची अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई


- १५० किलो गांजा, एकूण २० रु. किमतीच्या मुद्देमालासह दोन आरोपी अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ तस्करी व ईतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कार्यवाही चे निर्देश सर्व पोस्टे / उपपोस्टे / पोगके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.

आज २३ जुलै २०१३ रोजी सपोनि राजेश गावडे, पोलीस स्टेशन असरअल्ली यांना छत्तीसगड राज्यातून चारचाकी वाहनाने अंमली पदार्थ (गांजा) असरअल्ली कडे येत असल्याची गोपनिय खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन असरअल्ली हद्दीतील अमरअल्ली से पातागुडम रोडवरील फॅरिस्ट नाक्याजव सापळा लावला. 

सदर वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकाने वाहन न थांबविता सदरचे वाहन हे रोडच्या खाली उतरवून वाहनातील एक महिला व एक पुरुष यांनी पळ काढला असता, पोलीस स्टाफने त्यांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने एक महिला व एक परुष यांना पकडले. त्यानंतर सदर कारची पाहणी केली असता, कारच्या मागील डिक्कीमध्ये २६ लहान बॉक्स मिळून आल्याने सदर बॉक्समध्ये अंदाजे १५० किलो अंमली पदार्थ (गांजा) अंदाजे किंमत १५ लाख रुपये व सदर गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन (रेनॉल्ट डस्टर) क्र. एम एच ३४ ए एम ५५०१ अंदाजे किंमत ५ लाख रुपये असा एकूण अंदाजे किंमत २० लाख रुपये चा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल पोलीस स्टेशन असरअल्ली येथे आणून आरोपी १) शिव विलास नामदेव २) ज्योती सत्येंद्र वर्मा दोन्ही रा. उत्तरप्रदेश यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोस्टे असरअल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि. राजेश गावडे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन असरअल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि. राजेश गावडे यांच्या नेतृत्वात पोअं / जगन्नाथ कारभारी, पोअं /दिलीप ऊईके, पोअं/ शंकर सलगर, पोअं/ आदिनाथ कड यांनी पार पाडली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos